मधुमेह अथवा डायबिटीस हा रोग म्हणजे रक्तातिल साखर प्रमाणाबाहेर वाढून होणार रोग आहे. जगातील सर्वाधिक मधुमेहांची संख्या भारतात आहे आणि यापुढे ती आणखी वाढत जाण्याची शक्यता आहे. या रोगामध्ये डोळ्या व्यतिरिक्त मूत्रपिंड व हृदय अश्या जवळजवळ सर्व महत्वांच्या अवयवांवर दुष्परिणाम होते. इतर लोकांमध्ये दिसून येणाऱ्या नेत्रविकारांपेक्षा मधुमेही लोकांमध्ये नेत्रविकाराचे प्रमाण खुप जास्त असते. प्रत्येक मधुमेही व्यक्तीला डायबिटिक रेटिनोपैथी होईलच असे नाही पण मधुमेह झाल्यानंतर ही व्याधी होण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते अश्या परिस्थितीत आपण ( विशेषतः मधुमेहाच्या रुग्णांनी) या व्याधिची सविस्तार माहिती घ्यायला हवी विशेषतः पाच वर्षापेक्षा जास्त मधुमेह असलेल्या रुग्णामध्ये डोळ्यांवरील दुष्परिणाम हमखास दिसुन येतात. मधुमेहाचे निदान झाल्यावर, मधुमेहतज्ञ रुग्णाला डोळ्याची नियमित तपासणी करुण घ्यायला सांगतात कारण त्याचा सर्वाधिक परिणाम डोळ्यांवर होतो.

मधुमेहामुळे डोळ्यांचे कोणते विकार होतात ?

  • डायबिटीक रेटिनोपॅथी : हा सर्वात जास्त प्रमाणात आढळ्णारा दोष आहे. सर्वांपेक्षा गंभीर आणि द्रुष्टी कायमची अंधुक किंव्हा अंध करु शकणारा विकार म्हणजे मधुमेह्जन्य नेत्रपटल विकार अर्थात डायबिटिक रेटिनोपॅथि. यात डोळ्याच्या मागील पडद्यावरिल रक्त्वाहिन्या दोषग्रस्त होतात. मधुमेहामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते . त्यामुळे रक्तवाहिन्या विस्तारीत आणि आतुन पातळ होतात . रक्तवाहिण्यांच्या भिंती कुमकुवत झाल्याने कधी कधी त्यातुन रक्तस्त्राव होतो तर कधी कधी या रक्तवाहिण्या (केशवाहिन्या) अरुंद होवुन रेटीनाचा रक्तपुरवठा कमी होतो किंवा थांबतो. केषवाहिन्या अरुंद झाल्यावर रेटिनाचा रक्तपुरवठा पुर्वरत करण्यासाठी आपोआप नविन केशवाहिन्या तयार होतात. पण, या केशवाहिन्या अत्यंत नाजुक असल्याने त्या सहज फुटु शकतात. या केशवाहिन्या फुटल्यास अधिक गुंतागुंतिची समस्या निर्माण होते त्यामुळे पडद्यावर रक्ताचे ठिपके म्हणजे रेटिनल हिमरेज , मध्यबिंदुला सुज म्हणजे मॅक्युलर इडिमा , चरबीयुक्त रक्त संचयन म्हणजे एक्झुडेट असे दोष निर्माण होतात व नजर कमी होते. योग्य वेळी उपचार न केल्यास डोळ्यातील पाण्यात मोठे रक्तस्त्राव म्हणजे विट्रियस हिमरेज होवु शकते. अंधत्व असनारे दुषपरिणाम म्हणजे डोळ्याचा पडदा निसटने , यालाच रेटिनल डिटेचमेंट म्हणतात. अशा विकारामध्ये उपचार करुन देखिल द्रुष्टि पुर्ववत होऊ शकत नाही. वेळीच उपचार न केल्यास विकार वाढत जाऊन अंधत्वही येऊ शकते.
  • मोतीबिंदु : मधुमेही रुग्णामध्ये मोतीबिंदु खुप लवकर वयात होतो. हा मोतीबिंदु अचानक पिकु शकतो.
  • चष्म्याचा नंबर बदलणे : रक्तातील साखरेचे प्रमाण वरचेवर कमी जास्त झाल्यामुळे चष्म्याचा नंबर वारंवार बदलु शकतो. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त असल्यास चश्म्याचा नंबर काढु नये कारण जेव्हा रक्तातील साखर कमी होईल तेव्हा पुर्वीचा चष्मा लागणार नाही.
  • रांजणवाडी, डोळे येणे यासारखे रोग मधुमेही रुग्णांमधे जास्त दिसुन येतात.
  • नेत्रपटलावरिल रक्तवाहिन्या बंद पडणे.
  • काचबिंदु होणे ई. हे विकार मधुमेही रुग्णांमधे अधिक आढळतात.

 

डोळ्याची नजर कमी होईस्तोवर थांबेपर्यंत बराच उशिर झालेला असतो. कारण रुग्णांना कमी दिसेपर्यंत डोळ्याच्या पडद्यावरील दोष ईतका वाढला असतो की उपचार केल्यावरही द्रुष्टिमधे सुधार होइलच असे नाही. तरिही लेजर उपचारामुळे आहे ती नजर टिकवुन ठेवता येते.

यासाठी प्रत्येक मधुमेही रुग्णांनी डोळ्याची तक्रार नसताना ही वर्षातुन एकदा नेत्रतज्ञकडुन डोळ्याची संपुर्ण तपासणी करणे जरुरी आहे.लक्षात असु द्या डोळ्याची कम्प्युटर द्वारे तपासणी केल्यावरही डोळ्याचा पडदा तपासु शकत नाही. डोळ्याच्या तपासणीत नेत्रपटलावर म्हणजे रेटिनावर दोष आढळल्यास औषधींचा फारसा उपयोग होत नाही. क्वचित प्रसंगी पडद्यावरची सुज कमी करण्यासाठी किंव्हा रक्तस्त्राव थांबविण्याकरीता औषधी देण्यात येते.

लेजर उपचार : लेजर हे एक विशिष्ट प्रकारचे प्रकाश किरण असुण ते एका लेंन्सद्वारे डोळ्याच्या पडद्यावर पोहचविल्या जातात. सध्या लेजर उपचार हा अंधत्वापासुण दुर राहण्याचा एकमेव प्रभावशाली उपाय आहे. लेजर उपचारामुळे डोळ्याच्या पडद्यावरिल रक्तवाहिन्यांचे दोष निर्माण होणे टळते व पुढे रक्तस्त्राव , पडदा निसटणे असे अनेक दुष्परिणाम टाळले जातात.

काही रुग्णांमधे डोळ्याच्या पडद्यावरिल दोष अधिक झाल्यावर “ विट्रिएक्टॉमी ” नावाचे ऑपरेशन करावे लागते. हे फारच गुंतागुंतीचे व खर्चिक ऑपरेशन आहे व याचे परिणामही फारसे समाधान कारक नाहीत. त्यामुळे ही वेळ न येऊ देण्यासाठी वेळीच लेजर उपचार करुण घेणे योग्य आहे.

शेवटी लक्षात असु द्या, मधुमेहामुळे होणारे डोळ्याच्या पडद्यावरिल दोष रुग्णाच्या लक्षात येत नाही लक्षात येईपर्यंत फार उशीर होवु शकतो. त्यामुळे कुठलीही तक्रार नसतांना देखिल दरवर्षी नेत्रतज्ञकडुन तपासणी करुण घेणे आवश्यक आहे

 

 

मधुमेह आणि नेत्रविकार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *