या उन्हाळ्यात आपल्या डोळ्यांची काळजी घ्या

१००% युव्ही (जंबुलातीत किरण) संरक्षण देणारा चष्मा घालणे आवश्यकa

वाढते तापमान बघता, आपल्या डोळ्यांची काळजी घेणे फ़ार आवश्यक आहे, असे अमरावतीमधील नेत्रतज्ञ म्हणतात. आम्ही नेत्र शल्यचिकित्सक आणि मोतीबिंदु चिकित्सक असलेले डॉ. अतुल काढणे यांच्याशी बातचित केली असता,  आपल्याकरिता त्यांनी दिलेल्या काही महत्वाच्या काळजी विषयक सूचना घेऊन आलो आहोत:

युव्ही संरक्षण देणारे चष्मे घालावे

ज्या प्रकारे सनस्क्रीनमुळे त्वचेला युव्ही किरणांपासून होणाऱ्या हानी पासून वाचविता येते, त्याच प्रकारे डोळ्यांना हानी होऊ नये म्हणून युव्ही उपचार केलेले चष्मे उपलब्ध असतात. अल्ट्राव्हायोलेट किरणांशी जास्त प्रमाणात संपर्क आल्यास मोतीबिंदु, दृष्टीपटलास हानी आणि इतर डोळ्यांच्या समस्या उद्भवू शकतात. उन्हाळ्याकरिता लावायचा चष्मा म्हणजे रॅप अराऊंड  फ़्रेम (डोळे संपूर्णपणे झाकणारा चष्मा). यामुळे सुर्य आणि धुळ दोन्ही गोष्टी आपल्यापासून लांब राहातात. तसे बघायला गेले तर अल्ट्राव्हायोलेट किरणांमुळे पाणी आणि बर्फ़ाचे परावर्तन होते. या उन्हाळ्यात आपण पाण्यातील खेळांची मज्जा घेणार असलात किंवा एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी जाणार असलात तर, आपल्या कडे अशा प्रकारच्या चांगल्या चष्म्याची सोय असेल याची खात्री करून घ्या. आपण आपल्या डोळ्यांची काळजी घेतली नाही, तर डोळे लाल होतील आणि अगदी पारपटलास देखील हानी होई शकते. तीव्र उन्हामुळे आणि दीर्घकाळ बाहेर राहील्याने डोळ्यांवर ताण येऊन डोकेदुखी देखील होण्याची संभावना असू शकते. हे टाळण्याकरिता तीव्र सुर्यप्रकाश टाळा – टोपी आणि काळा चष्मा अवश्य वापरा.

तरण तलावावर (स्विमींग पूल) डोळ्यांचे संरक्षण

उन्हाळ्यामध्ये आरामात पोहत (डुंबत) राहाणे ही  या दिवसातील एक उत्तम कल्पना असते, पण ते आपल्या चष्म्याविना करू नये. उन्हाळ्यामध्ये तरण तलावमध्ये जास्त वेळ घालविल्याने त्वचेच्या समस्या या वाढतात, कारण पाणी सुरक्षित राहावे म्हणून त्यात क्लोरिन किंवा इतर केमिकलचा वापर केला जातो. आणि या सगळ्यामुळे तरण तलावामुळे डोळ्यांना संसर्ग होण्याची आणि चुरचुरणाऱ्या आणि पाणी येणाऱ्या डोळ्यांची समस्या होण्याची संभावना असते.आपण तरण तलावामधून बाहेर आल्यानंतर लगेच आपले डोळे स्वच्छ पाण्याने धुवावे.

डोळ्यास आराम (स्नेहक) देणारे आय ड्रॉप्स

उन्हाळ्यामध्ये फ़क्त आपली त्वचाच नव्हे तर डोळे देखील कोरडे होतात. डोळ्यांना स्नेहक देणारे आय ड्रॉप्स हे या काळात अगदी उत्तम ठरतात. या ड्रॉप्समध्ये कोणत्याही प्रकारचे प्रिझरवेटिव नसावे याची मात्र खात्री करून घ्या.

ए.सीचा ब्लास्ट आपल्यापासून लांब ठेवा

कोणत्याही ए.सी असलेल्या ठिकाणी बसताना त्याच्या झोताच्या अगदी समोर बसणार नाही याची काळजी घ्या कारण ए.सीचा थेट प्रवाह आपल्या डोळ्यांवर पडल्याने डोळे कोरडे होऊन संवेदनशील बनतात.

संरक्षक पण पारदर्शक काचा असलेला चष्मा वापरा

उन्हाळ्यामध्ये बाहेर जाणे देखील जास्ती होते. आपण बाहेर असताना संरक्षक पण पारदर्शी काचा असलेला चष्मा अवश्य वापरणे- सायकलिंग, कॅंपिंग, कॅम्प फ़ायर मध्ये स्वयंपाक करताना, मातीत गाडी चालवताना(डर्ट रायडिंग) – फ़ार महत्वाचे असते.

पी.एस.एस.टी: असुरक्षित असा सुर्य प्रकाश हा मोतीबिंदु निर्मीतीचा एक धोका आहे. यामुळे डोळ्यांना पिवळसरपणा किंवा लाली देखील येऊ शकते.

सूचना: उच्च दर्जाचा उन्हाळी चष्मा निवडणे ज्यामुळे १००% यु.व्ही संरक्षण मिळू शकेल हे फ़ार महत्वाचे आहे. दुय्यम दर्जाच्या चष्म्यांमुळे बाहुली वर ताण येतो, ज्यामुळे यु.व्ही किरण हे थेट डोळ्यावर पडून डोळ्यांना हानी होऊ शकते.